दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधून एक धक्कादायक माहिती समोर येतेय. दक्षिण भारतीय चित्रपट निर्माते केपी चौधरी यांनी आत्महत्या केली आहे. केपी चौधरी म्हणजेच शंकरा कृष्ण प्रसाद चौधरी हे टॉलीवूडमधील एक प्रसिद्ध चित्रपट निर्माते होते. त्यांनी २०१६ मध्ये रजनीकांतचा सुपरहिट चित्रपट ‘कबाली’ ची निर्मिती केली. २०२३ मध्ये, केपी चौधरी यांना सायबराबाद स्पेशल ऑपरेशन्स टीमने ड्रग्जशी संबंधित प्रकरणात अटक केली होती. आता त्यांनी आत्महत्या करत स्वतःचं जीवन संपवलंय.
गोवा पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीच्या तपासात असे सांगितले जात आहे की, प्रसिद्ध दक्षिण भारतीय चित्रपट निर्माते के पी चौधरी ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यानंतर आर्थिक संकटाचा सामना करत होते. काम नसल्यामुळे ते नैराश्यात होते. याआधी २०२३ मध्ये, त्यांना हैदराबाद पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. केपी चौधरी यांनी रजनीकांत यांच्या कबाली चित्रपटाची निर्मितीही केली. या प्रकरणाची चौकशी अजूनही सुरू आहे.
आर्थिक संकटाचा सामना करत होते
चौकशी केल्यावर असे आढळून आले की त्याचे क्लायंट केवळ टॉलीवूडमध्येच नाही तर कॉलीवूडमध्येही होते. सुरुवातीच्या अहवालांमधून आता असे दिसून आले आहे की अटक प्रकरणानंतर, ते आर्थिक अडचणींचा सामना करत होते आणि त्याच्या कर्जदारांकडून त्याच्यावर दबाव होता. चित्रपट उद्योगात अपयश आल्यानंतर, ते ड्रग्ज सप्लायसारख्या कामांमध्ये सामील झाले होते.
डेक्कन क्रॉनिकलच्या वृत्तानुसार, त्यांनी गोव्यात ओएचएम पब देखील उघडला होता जिथून तो प्रसिद्ध सेलिब्रिटींना ड्रग्ज पुरवत असत. २०१६ मध्ये, रजनीकांतचा सुपरहिट चित्रपट ‘कबाली’ प्रदर्शित झाला, ज्याची निर्मिती केपी चौधरी यांनी केली होती. इंडियन एक्सप्रेसमधील एका वृत्तानुसार, चित्रपटाने तेव्हा जगभरात ६५० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली होती. आणि त्या वर्षी तमिळ चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या चित्रपटांच्या यादीत ते अव्वल स्थानावर होते.