काही लोक सकाळी नशा करून कुस्ती खेळतात; संजय रावतांना टोला

Photo of author

By Sandhya

काही लोक सकाळी नशा करून कुस्ती खेळतात; संजय रावतांना टोला

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत नेहमीच विविध मुद्द्यांवरून शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतात. मात्र संजय राऊत यांच्या टीकेला सत्ताधारी पक्ष देखील सडेतोड उत्तर देताना दिसतात.

संजय राऊत यांच्याकडून लवकरच सरकार कोसळणार असल्याचा दावा केला जातो. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘काही लोक सकाळी नशा करून कुस्ती खेळतात’, असा टोला फडणवीसांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

अहमदनगर येथे छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्ती स्पर्धेच्या समारोपला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपस्थिती राहिले होते.

यावेळी फडणवीस यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली. फडणवीस म्हणाले की, “राजकारणामध्ये अलीकडच्या काळामध्ये काही लोक सकाळी नऊ वाजता नशा करून कुस्ती खेळायचा प्रयत्न करतात. पण नशा केलेल्या पैलवानांना कुस्तीच्या बाहेरच राहावं लागतं. जे असली मातीचे पैलवान असतात, तेच कुस्ती जिंकतात,” असा टोला नाव न घेता संजय राऊतांना लगावला.

Leave a Comment