काळवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय बालकाचा मृत्यू

Photo of author

By Sandhya

काळवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय बालकाचा मृत्यू

काळवाडी (तालुका जुन्नर )येथील काळेस्थळ वस्ती शिवारात बुधवारी दिनांक 8 सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात रुद्र महेश फापाळे या आठ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मूळचे बदगी बेलापूर येथील फापाळे हे यात्रेनिमित्त काळवाडी येथे त्यांचे नातेवाईक रोहिदास गेनभाऊ काकडे यांच्याकडे आले होते. रुद्र ची आई काल पुन्हा आपल्या गावी गेली असता दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. बिबट्याच्या हल्ल्यात मुलगा मृत्युमुखी पडल्याने त्याची आई भाग्यश्री फापाळे यांनी टाहो फोडला.

सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास रुद्र हा घराच्या जवळ खेळत होता. घराच्या बाजूला असलेल्या गोठ्याजवळ रुद्र जात असताना अचानक बिबट्याने येऊन त्याच्यावर हल्ला केला व त्याला उचलून घेऊन गेला.

बाजूच्या उसाच्या शेतात त्याचा मृतदेह आढळून आला.सदर घटनेची माहिती वनविभागाला कळविल्यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

काळवाडी व परिसरातील ग्रामस्थांचा मोठा उद्रेक झालेला असून बिबट्याचे हल्ले थांबविण्यासाठी वनविभाग तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी यावेळी ग्रामस्थ करीत आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page