कांदिवलीतील इमारतीला आग; दोघांचा मृत्यू, तिघे जखमी

Photo of author

By Sandhya

कांदिवलीतील इमारतीला आग; दोघांचा मृत्यू, तिघे जखमी

कांदिवली पश्चिम येथील महावीर नगर येथील पवनधाम वीणा संतूर इमारतीला आज लागलेल्या आगीत २ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण जखमी झाले आहेत.

अग्निशमन दलाच्या ८ गाड्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. ही आग भीषण आहे. या आगीने कांदिवली पश्चिम भागात धुराचे लोट पसरले आहेत.

मुंबईतील कांदिवली येथील आठ मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग लागली. या आगीत दोघांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.

ही घटना कांदिवली पश्चिम येथील महावीर नगर परिसरातील पवनधाम वीणा संतूर इमारतीत दुपारी १२.३० च्या सुमारास घडली. या घटनेत एकूण ५ जण जखमी झाले.

त्यांना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्यापैकी दोघांना मृत घोषित करण्यात आले. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Leave a Comment