खा. सुप्रिया सुळे : पंतप्रधानांचे स्वागत तुतारी वाजवून करू…

Photo of author

By Sandhya

खा. सुप्रिया सुळे

नागरिकांशी अनेक विषयांवर चर्चा होत आहे. लोक उत्सुक आहेत, ते दुष्काळावरदेखील बोलत आहेत. तसेच अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे आणि जेवढे काही पाहुणे आपल्याकडे येतील त्यांचे आम्ही तुतारी वाजवून आदराने स्वागत करू, अशी खोचक प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

पुण्यामध्ये रविवारी सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्या वेळी पश्चिम महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आठ ते दहा सभा होत असल्याबाबत सुळे यांना प्रश्न विचारला होता, त्यावर त्या बोलत होत्या. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील 14 उमेदवारांच्या प्रचारासाठी चार दिवसांमध्ये नऊ जाहीर सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहेत.

सोमवारी 29 एप्रिल आणि मंगळवारी 30 एप्रिल या दोन दिवशी पश्चिम महाराष्ट्रात सहा सभा होणार आहेत. सुळे म्हणाल्या, निवडणुकीबाबत नागरिकांमध्ये प्रचंड असा उत्साह आहे. त्यामुळे आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळत असून नागरिक अनेक विषयांवर चर्चा करत आहेत.

दुष्काळाचा विषय गंभीर बनला असून लोक त्याबाबतदेखील बोलत आहेत. मी केलेल्या विकासांची कामे स्वतः केली असल्याचं खासदार सांगत असल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केली होती. त्यावर सुळे म्हणाल्या, गेली सतरा-अठरा वर्षे आम्ही एकत्र काम केलं आहे. त्यामुळे विकासकामे आम्ही एकत्रित केली आहेत. 

Leave a Comment