खडकवासला धरण 97 टक्के भरले ; पाण्याचा विसर्ग 856 क्यूसेक इतका

Photo of author

By Sandhya

खडकवासला धरण

खडकवासला धरण परिसरात होणाऱ्या पावसामुळे धरण 97 टक्के भरले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे जलसाठ्यात वाढ होत आहे.

त्यामुळे खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात 428 क्युसेकनं सुरू असलेला पाण्याचा विसर्ग वाढवून आज  दुपारी 3.00 वाजता 856 क्यूसेक इतका करण्यात आला आहे.

त्यामुळे खबरदारी म्हणून नागरिकांनी नदीपात्रात उतरु नये. वाहने नदीपात्रात लावू नयेत. सखल भागातील नागरिकांनी सतर्क रहावे. तसेच आवश्यक ती खबरदारी घ्यावी. असे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

दरम्यान, पुणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या 95 टक्के पाऊस झाला आहे. मावळ तालुक्यात सर्वाधिक तर पुरंदर तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page