खासदार संजय राऊत : राजकीय युद्धात आणि तहात या वेळी आमचाच विजय 

Photo of author

By Sandhya

खासदार संजय राऊत

आगामी निवडणूकांमध्ये मावळ, बारामती, शिरूरमध्ये मशाल आणि विजयाची तुतारी वाजेल,असे प्रतिपादन खासदार संजय राऊत यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या तहाचा उल्‍लेख केला जातो. शिवसेना आणि राष्ट्रवादीनेही प्रत्‍येकी ४० खासदार दिले आहेत.

आगामी काळात महाराजांचा स्‍वाभिमानी बाणा घेऊन त्‍या बदल्‍यात ८१ आमदार आणि जास्‍तीत जास्त खासदार निवडून आणू. या वेळी युद्धात आणि तहात आमचाच विजय असेल, असे खासदार राऊत म्‍हणाले.

तर्उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातारा दौर्‍यावर असताना त्यांचे स्वागत 50 तुतारी वाजवून केले. यावेळी ते पहिल्यांदाच तुतारी निनादाला घाबरले असल्याची कोपरखली खासदार संजय राऊत यांनी लगावली.

दिवंगत माजी खासदार गजानन बाबर यांच्‍या जीवनरुपी संघर्षयात्री पुस्‍तकाचे प्रकाशन खासदार शरद पवार, संजय राऊत यांच्‍या प्रमूख उपस्‍िथतीत झाले. या वेळी खासदार राऊत बोलत होते.

या वेळी खासदार श्रीनिवास पाटील, अमोल कोल्‍हे, माजी आमदार अॅड. गौतम चाबुकस्‍वार, माजी महापौर संजोग वाघेरे, प्रकाश बाबर, योगेश बाबर, शिवसेना शहर प्रमुख अॅड. सचिन भोसले आदीसह विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी या वेळी उपस्‍िथत होते. खासदार संजय राऊत म्‍हणाले की, इतिहास लढणाऱ्यांचा लिहिला जातो.

आम्‍ही कोणत्‍याही लढ्याला घाबरत नाही. महाराष्ट्राला संघर्षाशिवाय काहीच मिळाले नाही. मराठी माणसांच्‍या वाट्याला कायम संघर्ष आला आहे. त्‍या संघर्षाची ठिणगी स्‍वाभिमानात पेटवण्याचे काम बाळासाहेब ठाकरे यांनी केले.

त्‍यामुळेच गजानन बाबर यांच्‍यासारखे नेतृत्‍त्‍व तयार झाले. वाकणारे, झुकणारे आणि विकणारे नेतृत्‍त्‍व शिवसेनेत नाहीत. लोकशाही टिकविण्यासाठी सर्वांनीच संघर्षयात्री होण्याची गरज असल्‍याचे रा्ऊत म्‍हणाले.

Leave a Comment

You cannot copy content of this page