खातेवाटप झाले त्याचप्रमाणे मंत्रिमंडळ विस्तार अगदी सोप्या पद्धतीने होईल; उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस

Photo of author

By Sandhya

खातेवाटप झाले त्याचप्रमाणे मंत्रिमंडळ विस्तार अगदी सोप्या पद्धतीने होईल; उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस

राज्याच्या हितासाठी तिन्ही पक्षांनी ठरवले आहे की एकत्रितपणे  काम करायचे आहे त्यामुळे खातेवाटप झाले त्याचप्रमाणे मंत्रिमंडळ विस्तार आणि पालकमंत्री देखील अगदी सोप्या पद्धतीने होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखविला.

नागपुरातील विमानतळावर फडणवीस बोलत होते. पालकमंत्रीपदाचे वितरणही लवकरच होईल. तो काही मोठा मुद्दा नाही. आम्ही ते लवकरच करू अगदी खातेवाटप जसं सोप्यारीत्या झालं, तसच आमचे सर्व काही सोप्या रीतीने होणार आहे.

तिन्ही पक्षांनी ठरवले आहे की एकत्रितपणे महाराष्ट्राच्या हितासाठी काम करायचे आहे. म्हणून मला नाही वाटत की त्याच्यात काही वाद होईल.

दरम्यान, सरकार मध्ये कुठलीही नवीन व्यवस्था निर्माण केलेली नाही. सर्व काही जुन्याच व्यवस्था आहेत. विरोधीपक्ष नेत्यासंदर्भातला निर्णय विधानसभा अध्यक्ष ठरवतील त्याप्रमाणे होईल असेही देवेंद्र फडणवीस यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

Leave a Comment