कोल्हापुरात आक्षेपार्ह स्टेटस वरून दंगल उसळली. त्यानंतर कायदा व सुव्यवस्थेसाठी बुधवारी (दि. ७) सायंकाळी 5 वाजल्यापासून इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते.
गुरुवारी (दि. 8) रात्री 12 पर्यंत इंटरने बंदचे आदेश दिले होते. मात्र, अद्यापदेखील इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आलेली नाही. त्यामुळे कोल्हापूरमध्ये इंटरनेट सेवा कधी सुरू होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, अद्ययावत माहितीनुसार, आज शुक्रवारी (दि.9) सकाळी 10.00 नंतर इंटरनेट सेवा पूर्ववत होणार आहे, अशी माहिती पुढारीशी बोलताना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली.
दरम्यान, इंटरनेट बंद असल्यामुळे डिजिटल व्यवहारावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक डिजिटल व्यवहार ठप्प झाले आहेत. तसेच इंटरनेट बंद असल्यामुळे अनेकांसाठी मनोरंजनाचे साधन बंद झाले आहेत. त्यामुळे प्रत्येकाला इंटरनेट सेवा पुन्हा कधी सुरू होणार याकडे लक्ष लागले आहे.