कौटुंबिक वादातून एनडीएतील उच्चपदस्थ अधिकार्‍याला मारहाण

Photo of author

By Sandhya

मारहाण

कौटुंबिक वादातून एनडीएतील उच्चपदस्थ अधिकार्‍याला निवृत्त न्यायाधीश पत्नी, निवृत्त कर्नल सासरे यांच्याकडून मारहाण झाल्याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्या अधिकार्‍याला राहत्या घरात डांबून ठेवत नोकरी घालविण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मात्र याप्रकरणात यापूर्वी पत्नीने देखील मेजर असलेल्या पती विरोधात छळ केल्याची तक्रार दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी उच्च पदस्थ पदधिकार्‍याने दिलेल्या तक्रारीवरून त्यांच्या पत्नीसह सासू-सासर्‍यांवर मारहाण, धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एनडीएमध्ये मेजर आहेत. तर त्यांची पत्नी या स्वेच्छानिवृत्त न्यायाधीश असून, त्या एका लॉ कॉलेजमध्ये प्राध्यापकाचे काम करतात.

तर त्यांचे वडील हे निवृत्त कर्नल आहेत. डिसेंबर 2022 मध्ये पती-पत्नीचा कौटुंबिक वाद झाल्यानंतर त्यांच्या पत्नी आणि सासू-सासर्‍यांनी फिर्यादी यांना राहत्या घरात डांबून ठेवले.

तसेच त्यांना कामावर जाण्यास अटकाव करून, जोरजोराने आरडाओरडा करत शिव्या देऊन त्यांची नोकरी घालवण्याची व कोर्ट मार्शल करण्याची धमकी देत मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. 

Leave a Comment