कुस्तीपटूंच्या आंदोलनावर सचिन तेंडुलकर गप्प का?

Photo of author

By Sandhya

कुस्तीपटूंच्या आंदोलनावर सचिन तेंडुलकर गप्प का?

ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी गेल्या काही दिवसांपासून अनेक कुस्तीपटू आंदोलन करत आहेत. नव्या संसद भवनाच्या कार्यक्रमादिवशी पोलिसांनी कुस्तीपटूंचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर कुस्तीपटूनि अधिक आक्रमक होत आपले मेडल्स गंगेत अर्पण करणार असल्याचा निर्णय घेतला. कुस्तीपटूंनाच्या या निर्णयाला अनेक खेळाडूंनी पाठींबा देखील दिला आहे.

मात्र क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अशात युवक काँग्रेसने सचिनच्या घराबाहेर बोर्ड लावत तू याबाबत गप्प का ? असा सवाल उपस्थित केला आहे.

“मत विरहित भारतरत्न सचिन तेंडुलकरजी भारताच्या अंतर्गत बाबीमध्ये तुम्ही मूग गिळून गप्प का? असा सवाल यावेळी लावण्यात आलेल्या होर्डिंगवरून विचारण्यात आला आहे. तसेच “किसान आंदोलनावर बोलणाऱ्या परकीय महिला खेळाडूला तुम्ही सणसणीत उत्तर दिलं होतं.

आमच्या देशांतर्गत प्रश्नात तू नाक खुपसू नकोस, असं सुनावलं होतं. आज मात्र सचिन तुझे तेच देश प्रेम कुठे गेले आहे? सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीच्या धाडींची तुला भीती वाटतीये का? तू कुठल्यातरी दबावाखाली आहेस का? अशी विचारणा देखील यावेळी करण्यात आली आहे.

‘क्रीडा विश्वातील तुम्ही देव माणूस आहात. एक भारतरत्न देखील आहात मात्र जेव्हा क्रीडा विश्वातील काही महिला लैंगिक अत्याचार विरोधात आवाज उठवत आहेत. तेव्हा मात्र आम्हाला तुमच्यातील माणूस आणि तुमच्यातील माणुसकी कोठेही दिसून येत नाही.’असा आशय या बोर्डावर पाहायला मिळतो.

Leave a Comment