लाडकी बहीण योजनेतील हप्ते डिसेंबरमध्ये वितरित, आदिती तटकरे यांची महत्त्वपूर्ण घोषणा

Photo of author

By Sandhya

खुशखबर! ‘लाडकी बहीण’चे हप्ते पुन्हा सुरु, महिना अखेरपर्यंत लाभार्थ्यांना मिळणार पैसे

या योजनेतील पात्र २ कोटी ३४ लाखांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना हप्ता देण्यात येणार असून, या व्यतिरिक्त आधार सीडिंग पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांनाही हप्ताचे वितरण करण्यात येणार असल्याची तटकरे यांनी जाहीर केले.
मुंबई : महायुतीसाठी विधानसभा निवडणुकीत लक्षवेधी ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणास अखेर सुरुवात झाली आहे. महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भातील घोषणा केली. मंगळवारपासूनच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ‘डीबीटी’द्वारे रक्कम जमा करण्यास सुरुवात झाल्याची माहिती तटकरे यांनी दिली.
या योजनेतील पात्र २ कोटी ३४ लाखांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना हप्ता देण्यात येणार असून, या व्यतिरिक्त आधार सीडिंग पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांनाही हप्ताचे वितरण करण्यात येणार असल्याची तटकरे यांनी जाहीर केले.
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनातही यासंदर्भातही प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. अखेर आदिती तटकरे यांनी या संदर्भातील महत्त्वपूर्ण घोषणा मंगळवारी केली. या अगोदर गेल्या पाच महिन्यांत राज्यातील कोटयवधी पात्र महिलांना साडेसात हजार रुपये मिळाले आहेत. त्यानंतर आता आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया मंगळवारपासून पुन्हा कार्यान्वित करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात आधार सीडिंग राहिलेल्या १२,८७,५०३ पात्र महिलांना आणि दुसऱ्या टप्प्यात सुमारे ६७,९२,२९२ पात्र महिलांना डिसेंबर महिन्याचा सन्मान निधी प्रदान करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे त्यांनी जाहीर केले.

Leave a Comment

You cannot copy content of this page