लग्नघटिका जवळ येत असताना नवरी मुलगी गायब; प्रियकरासोबत गेली पळून

Photo of author

By Sandhya

लग्नघटिका जवळ येत असताना नवरी मुलगी गायब; प्रियकरासोबत गेली पळून

लग्नघटिका जवळ येऊन ठेपलेली असतानाच नवरीने प्रियकरासोबत धूम ठोकल्याने वर्‍हाडी मंडळीला नैराश्याने परतावे लागले. राहुरी शहरातील बारागाव नांदूर रोड येथे असलेल्या परिसरातील एका 19 वर्षीय तरुणीचे आणि राहुरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन येथील एका तरुणाचे गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते.

सुमारे एक वर्षांपूर्वी ते जोडपे सैराट झाले होते. त्यावेळी नातेवाईकांनी त्यांचा शोध घेऊन त्यांना परत आणले होते. त्यानंतरही त्यांचे प्रेमसंबंध सुरूच होते. त्या 19 वर्षीय तरुणीचा विवाह शिर्डी येथील एका तरुणाशी जमला होता.

काल (दि. 30) दुपारी बारा वाजे दरम्यान तीचे लग्न लागणार होते. शिर्डी येथील नवरदेवासह वर्‍हाडी मंडळी सकाळीच राहुरी येथील नवरीच्या दारात येऊन बसले होते. लग्नघटिका जवळ येत असताना नवरी मुलगी गायब झाल्याचे समजले.

नवरी मुलीच्या नातेवाईकांनी तीचा शोध घेऊन माहिती घेतली असता त्यांना समजले कि, नवरी मुलगी ही तीच्या प्रियकरा सोबत सैराट झाली. तेव्हा नवरदेवाकडील लोकांनी सांगीतले की,

नवरी मुलीला लवकर घेऊन येत असाल तर आम्ही लग्न लावून नवरीला घेऊन जायला तयार आहोत. तेव्हा नवरी मुलीच्या नातेवाईकांनी तीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ती मिळून आली नाही.

Leave a Comment