महादेव जानकर : “मेलो तरी चालेल पण कमळ, हात आणि धनुष्यबाण चिन्हावर…”

Photo of author

By Sandhya

महादेव जानकर

परभणीतून महायुतीचे उमेदवार आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर लोकसभा निवडणुकीसाठी रिंगणात उतरले आहेत. यातच आता महादेव जानकरांनी मेलो तरी चालेल पण कमळ, हात आणि धनुष्यबाण चिन्हावर कधीही निवडणूक लढवणार नाही,

असे विधान केले आहे. विशेष म्हणजे महादेव जानकरांना महायुतीकडून परभणीतून उमेदवारी देण्यात आली, अशात त्यांनी असे विधान केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. काय म्हणाले महादेव जानकर ?

“बारामती शहराने 2014 साली माझ्यावर आणखी जरा प्रेम केलं असत मी पवारांना हरवलं असतं. तेव्हा तर माझं चिन्हही लोकांपर्यंत पोहचल नव्हतं, वेळही मिळाला नव्हता. अनेकजण म्हणत होते की कमळ चिन्हावर लढा. पण मी ठरवलं आहे आपल्या पक्षाच्या चिन्हावर लढायचं.

मेलो तरी चालेल पण कमळ, हात, धनुष्यबाण बाण चिन्हावर लढणार नाही. मी पक्ष काढलेला आहे आणि माझ्याच पक्षावर मला आमदार-खासदार व्हायचं आहे. मी युती कुणाशीही करेल,” असे महादेव जानकर म्हणाले.

दुसऱ्याच्या महालात जाऊन गुलाम होण्यापेक्षा स्वतःच्या झोपडीत मालक म्हणून राहणे चांगले आहे. माझी विचारसरणी ही वेगळी असून ती धरूनच मी इतर पक्षांशी युती करत आहे. मनोज जरांगेंच्या अंतरवाली सराटीमधून ७० टक्के मतदान घेणार असल्याचा विश्वासही जानकरांनी व्यक्त केला.

तसेच बारामतीच्या निवडणुकीच्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी कमळावर लढ म्हंटले होते. पण मी त्याला नकार दिला होता. मात्र आता स्वतःच्या पक्षाच्या चिन्हावर मी दिल्लीत जाणार असल्याचा विश्वास जानकरांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, जानकर हे परभणीतून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. येथे महादेव जानकरांची लढत संजय जाधव यांच्याशी आहे.संजय जाधव गेल्या 10 वर्षांपासून परभणीचे खासदार आहेत. त्यामुळे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. राज्यातील दुसऱ्या टप्प्यात परभणी लोकसभा मतदारसंघासाठी मतदान झाले आहे.

Leave a Comment