महाळुंगे – वारूळवाडी रस्त्याला खड्डेच खड्डे पडले असून रस्त्याच्या कामाला निधी मंजूर झालाय. परंतु ठेकेदार काम सुरु करण्याबाबत टाळाटाळ करीत असल्याने सरपंच राजू मेहेर यांनी आमदार शरद सोनवणे भाजपा नेत्या आशाताई बुचके यांनाही सांगितले. परंतु संबंधित अधिकारी आणि ठेकेदार कामाला सुरुवात करीत नसल्यामुळे ठाकरवाडी येथील लोकांनी आज रास्ता रोको आंदोलन केले.
वारूळवाडी येथील स्थानिक ग्रामस्थांनी यावेळी सांगितले की वारूळवाडी -महाळुंगे खिंड या रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे झाले असून या रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामध्ये जर कोणतीही अघटीत घटना घडली तर या घटनेला जे प्रशासन आहे ते जबाबदार राहील. काही शेतकऱ्यांच्या पाईपलाईन फुटल्या त्याची नुकसान भरपाई तसेच काही शेतकऱ्यांची शेतातील माती PWD च्या ठेकेदाराने विकली. त्याची भरपाई मिळावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केली आहे.