महामार्गावर कोळशाचे ढीग; नऱ्हे भुमकर पुलावर भरधाव वेगाने जाणारा कोळश्याचा कंटेनर पलटी

Photo of author

By Sandhya

महामार्गावर कोळशाचे ढीग; नऱ्हे भुमकर पुलावर भरधाव वेगाने जाणारा कोळश्याचा कंटेनर पलटी

मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर नऱ्हे येथील भुमकर पुलावर भरधाव वेगाने कोळसा घेऊन जाणारा कंटेनर पलटी झाला. हा अपघात १० जुलै रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातामुळे महामार्गावर कोळशाचे ढीग लागल्याने सातारा बाजुकडे जाणारी वाहतुक पुर्णपणे बंद झाली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा कंटेनर कात्रज नवीन बोगद्याच्या बाजुने वारजेकडे भरधाव वेगाने जात असताना भुमकर पुलावर रस्त्याचे दुभाजक तोडून दोन कंटेनरला धडक देऊन तसेच विजेचा पोल तोडून दुसऱ्या लेनवर जाऊन पलटी झाला. या अपघातात कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला आहे.

अपघाताची माहिती समजताच सिंहगड अग्निशमन दल, सिंहगडरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन, पो नि. जयंत राजुरकर, सपोनि राहुल यादव, प्रविण जाधव, वाहतुक शाखेचे पांडुरंग वाघमारे, प्रशांत कणसे, अग्निशमन दलाचे प्रभाकर उम्राटकर इत्यादी त्वरित घटनास्थळी दाखल झाले आहेत. रस्त्यावरील कोळसा आणि वाहन बाजुला काढण्याचे काम सुरू आहे.

Leave a Comment