अहमदनगर शहरामध्ये गुन्हेगारीच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीये, जीवघेणे हल्ले, खून, दरोडे, मारामारी यासारख्या घटना दिवसाढवळ्या घडत आहे.
आज बुधवारी दुपारच्या सुमारास न्यू आर्ट्स कॉलेज महाविद्यालयाच्या बाहेरील परिसराच्या आवारात एका तरुणावर काही इसमानी धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला केला.
यामध्ये महाविद्यालयीन युवराज गुंजाळ (रा. सोनेवाडी) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. त्याला अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.
कोयता हल्ला करणाऱ्या आरोपींचा शोध तोफखाना पोलीस घेत आहे.