माळीण ची पुनरावृत्ती ; इर्शाळवाडीवर कोसळली दरड

Photo of author

By Sandhya

माळीण ची पुनरावृत्ती;इर्शाळवाडीवर कोसळली दरड

रायगड जिल्ह्यातील खालापूरच्या इर्शाळवाडीवर दरड कोसळल्याने अनेक कुटुंब मलब्याखाली अडकली असल्याने या गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे .बुधवार (दि.20) रात्री ही दरड कोसळली आहे.

रात्री मुसळधार पाऊस असल्यामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण झाला होता.आता सकाळी उजाडल्यानंतर बचावकार्याला वेग आला आहे.


अत्यंत धक्कादायक ही घटना आहे.आतापर्यंत 75 जणांना वाचवण्यात यश आले आहे.तर 5 जणांचा मृत्यू झाला आहे.या घटनेत मृतांची संख्या वाढण्याची भीती असून 15-20 नागरिकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी दाखल झाले आहेत.


नातेवाईकांना अश्रू अनावर झाले आहे.कुणाची मुलगी, कुणाचा भाऊ या मलब्याखाली अडकले आहेत.जीवाचा आकांत करून लोक त्यांच्या नातेवाईकांना शोधत आहेत.

एक बाप बदलापूर वरून मुलीला शोधायला आल्याचे खचलेल्या बापाने सांगितले.त्याला प्रश्न विचारला असता त्याच्या डोळ्यात फक्त अश्रू होते. बचावकार्य करताना एका एनडीआरए जवाणाचा मृत्यू झाला आहे.


एनडीआरएफच्या 2 पथकांनी घटनास्थळी पोहचून शोध आणि बचावकार्य करत आहेत.या गावात महाराष्ट्राचे मंत्री उदय सामंत आणि दादा भुसे हे रायगड जिल्ह्यातील खालापूरच्या ईर्शाळवाडी येथे पोहचले आहेत.

Leave a Comment