मनोज जरांगे-पाटील : बजेटमधून आरक्षण देता आले तर पटकन द्या…

Photo of author

By Sandhya

मनोज जरांगे- पाटील

बजेटबद्दल मला काहीही कळत नाही. मात्र, बजेटमधून आम्हाला आरक्षण देता आले तर पटकन द्या, अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी गुरुवारी जालना येथे व्यक्त केली.

ते पाच महिन्यानंतर घरी परतले आहेत. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मी 10 फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहे.

सरकारमधील कोणीही आरक्षणाबद्दल विसंगत विधाने करू नयेत. ज्याला काही म्हणायचे आहे ते त्याने दिलखुलासपणे म्हणावे, असा टोलाही त्यांनी लगावला.

Leave a Comment

You cannot copy content of this page