मनोज जरांगे पाटील : मराठा समाजाच्या आरक्षणानंतर धनगर, मुस्लिमांच्या आरक्षणासाठी लढा देणार

Photo of author

By Sandhya

मनोज जरांगे पाटील

मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोठा लढा देत आहे. याप्रकरणी त्यांनी मुंबईमध्ये मोठ्या संख्येने आंदोलन केले. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला मोठे यश मिळाल्यानंतर ते आज रायगडावर जाणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

मराठा समाज मागास असल्याचे सरकारने सिद्ध करावं. ती सरकारची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इतकेच काय तर मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर आणखी दोन समाजांसाठी आरक्षणाचा लढा लढण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला.

मराठ्यांना आरक्षण मिळाले की, धनगर आणि मुस्लिमांना आरक्षण कसं देत नाही तेच बघतो” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

“70 वर्षात आता मराठ्यांसाठी कायदा बनला आहे. मराठ्यांना आरक्षण मिळेलच, पण त्या सोबत सगेसोयऱ्यांनाही आरक्षणाचा लाभ मिळेल. एकही मराठा ओबीसीत जाण्यापासून वंचित राहणार नाही.

“मराठ्यांचा विजय झाला पण नव्या कायद्यानुसार पहिल प्रमाणपत्र मिळालं की, महादिवाळी साजरी करु, गुलाल उधळू”, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. सरकार छगन भुजबळांना घाबरत नाही – जरांगे पाटील 

ओबीसींसाठी काही करता आले नाही, तर मी पदाचा राजीनामा देईल, अशी भूमिका मंत्री छगन भुजबळ यांनी केली होती. त्यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले, “आधीच राजीनामा द्याला पाहिजे होता.

आता राजीनामा देऊन ओबीसी समाजावर उपकार करताय का? छगन भुजबळ हे राजकारणी आहेत. स्वत:च्या स्वार्थासाठी ओबीसी आणि मराठा बांधवात तेढ निर्माण करू लागले आहे. राज्य सरकार छगन भुजबळांना घाबरत नाही.”

Leave a Comment