मनोज जरांगे पाटील : ‘मुख्यमंत्र्यांनी कुणाचं ऐकून दगाफटका करू नये, अन्यथा…’

Photo of author

By Sandhya

मनोज जरांगे पाटील

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याची तयारी राज्य सरकारकडून सुरु आहे. आम्हाला ही माहिती 15 दिवसांपासूनच आहे.

या हालचाली 3 महिन्यांपूर्वीच्या आहेत, या हालचाली नवीन नाहीत, हैद्राबाद गॅझेट लागू करणार हे श्रेय गोर गरीब मराठ्यांचे आहे, हे यश गरिबांचे आहेत.

मात्र आम्ही एवढ्यावर थांबणार नाही, आम्हाला सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी पाहिजे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. जालन्यामध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील? “हैद्राबाद गॅझेट आणण्याच्या हालचाल आजच्या नाहीत, शंभूराज देसाई 3 महिन्यांपासून प्रयत्न करत आहेत. मात्र आम्ही एवढ्यावर थांबणार नाही, आम्हाला सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी पाहिजे. कोणीही छाती बडवून घेऊ नका, हे मराठ्यांचे श्रेय आहे.

मुख्यमंत्र्यांनी संभाजीनगरच्या पालकमंत्र्यांचे किंवा कोणाचंही एकूण गोरगरीब मराठ्यांशी दगा फटका करू नये,” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. “राज्यात वेगवेगळी आंदोलन सुरू होत आहेत.

आम्हाला त्याचं काही वाट नाही. अधिकार प्रत्येकाला आहे, ज्याने त्याने आंदोलन करावं, पण माझ्या मराठ्यांना खरचटलं नाही गेलं पाहिजे. आमच्या मराठ्यांना गाल बोट लगता कामा नये. हैद्राबाद गॅझेटचा सर्वानाच मोठा फायदा होणार आहे.

हैद्राबाद गॅझेट, सातारा संस्थानच गॅझेट लागू होणे म्हणजे शासकीय नोंदी आहेत मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून मी रात्री 12 वाजता आमरण उपोषण सुरू करणार आहे. अन्याय विरोधात उठाव करण्यासाठी मी उपोषण करणार आहे,” असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Leave a Comment