मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण घेतले मागे ; देवेंद्र फडणवीस म्हणाले…

Photo of author

By Sandhya

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण घेतले मागे ; देवेंद्र फडणवीस म्हणाले

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणाच्या बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी अखेर काल नवव्या दिवशी मंत्रिमंडळ समितीच्या शिष्टाईनंतर आपले उपोषण मागे घेतले आहे.

बेमुदत उपोषण मागे घेतले असले तरीही त्यांनी आंदोलन मागे घेतलेले नाही. मराठा समाजाला सरसकट आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे. सरकारने दोन महिन्यांची मुदत मागितली होती.

मात्र त्यांनी २४ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर आम्ही मुंबईचे नाक बंद करु असा इशारा त्यांनी दिला आहे. मनोज जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

मराठा आरक्षणासाठी गेल्या नऊ दिवसांपासून उपोषणाला बसलेले “मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतल्याबद्दल राज्य सरकारच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो.

या प्रक्रियेत माजी न्यायमूर्ती न्या. सुनील शुक्रे आणि न्या. मारोती गायकवाड यांनी राज्य सरकारला बहुमूल्य सहकार्य केले, मी त्यांचे विशेष आभार मानतो. माझ्या सर्व सहकारी मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांचेही आभार ! “अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

२४ डिसेंबरनंतर सरकारला एकही दिवस वाढवून न देण्यास जरांगे पाटलांनी विरोध केलाय. सरकारच्या शिष्टमंडळाने २ जानेवारीपर्यंत वेळ देण्याची विनंती मनोज जरांगे यांना केली.

पण जरांगे पाटील २४ डिसेंबर या तारखेवर ठाम राहिले. त्यानंतर तारखेबाबत बराच वेळ चर्चा देखील करण्यात आली. अखेर त्यांनी दोन महिन्यांची मुदत देत असल्याचे म्हटले आहे. तसेच २ जानेवारीनंतर मुंबईचं नाक बंद करु असा इशारा दिला आहे.

सरकारकडून गेलेल्या शिष्टमंडळाला मोठे यश आले. कारण २५ ऑक्टोबरपासून सुरु असलेलं जरांगे पाटलांचे उपोषण त्यांनी अखेर मागे घेतले.

दरम्यान त्यांनी सरकारला दोन महिन्यांची मुदत देखील यावेळी दिली. सरकारला मुदत देण्याच्या कालावधी वरुन प्रदीर्घ काळ चर्चा सुरु होती. पण जरांगे पाटील हे त्यांच्या भूमिकेवरही ठाम होते.

Leave a Comment