
शुक्रे समितीने 15 दिवसांच्या अतिशय विक्रमी वेळेत सुमारे दीड कोटी लोकांचे सर्वेक्षण केले. इतक्या कमी वेळात सर्वेक्षण होणार असेल, तर अजून थोडा वेळ वाढवून जातनिहाय जनगणनेचे सर्वेक्षणही पूर्ण करून घ्यावे, अशी मागणी मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी केली आहे.
मराठा आरक्षणाबाबत शुक्रे समितीने शासनास अहवाल सादर केला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी आपला कुठलाही विरोध नसून पाठिंबाच आहे.
ओबीसींमध्ये 370 हून अधिक जाती असताना खोट्या नोंदी करून कुणबी दाखले दिले जात आहेत. सरकारने हे कुणबीकरण थांबविले पाहिजे. तसेच, ओबीसी समाजात आलेल्या सर्व कुणबींना स्वतंत्र मराठा आरक्षण द्यावे, असे ते म्हणाले.