काशीग ते पौड पदयात्रेत महिला, युवक, मुले मोठ्या संख्येने उपस्थिती मुळशीतून मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आमरण उपोषण समर्थनार्थ पौड येथील तहसिल कचेरी समोर प्रमोद बलकवडे यांनी बेमुदत आणि साखळी उपोषण सुरू असून याचा आज चौथा दिवस आहे त्यांना मुळशीतील ग्रामपंचायती, प्रतिष्ठाण, पक्ष, यांनी पाठिंबा दर्शवला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज आंदोलन करीत असून याचा मुळशीत पडसात उमटले दिसून येत आहे. याचा कोळवण खोऱ्यातील मराठा समाजाच्या वतीने सोळा किलोमीटर भव्य पदयात्रा काढण्यात आली.
यामध्ये काशिग, हाडशी,कुळे,दखणे,चाले, मुगावडे ,वाळेण, भालगुडी, डोंगरगाव, कोळवण साठेसाई, डोंगरगाव वाडी,होतले,सावरगाव करमोळी,नांदगाव,चिखलगाव तसेच मुळशीतील इतर गावातील सुद्धा नागरिक, महिला, लहान मुले यांनी मोठ्या संख्येने सामील झाले होते.
काशीग ते पौड याठिकानाहून मोठ्या संख्येने समाज एकवटला होता पौड तहसिल ला आल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिववंदना म्हणण्यात आली.
घेतली एक मराठा लाख मराठा घोषणा देण्यात आल्या यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि कसे मिळाले पाहिजे याबाबत समाजाला संबोधित करण्यात आले तसेच याठिकाणी पुढारपणा साठी नको शिक्षण आणि नोकरी करीता आरक्षण द्यावे, असे मनोगत व्यक्त करण्यात आले.
यावेळी तहसिलदार रणजित भोसले व पौड पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांना शाळेतील विद्यार्थिनीच्या हस्ते निवेदन देण्यात आले. पद यात्रेची सांगता पसायदान म्हणून करण्यात आली.
मुळशी बंदच्या हाकेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला असून सर्व दुकाने, खाजगी कार्यालय,छोटे. मोठे व्यावसायिक तसेच घोटावडे फाट्यावर असलेली औद्योगिक वसाहत सुद्धा मुळशी बंद मध्ये सहभागी झालेला होता. बंद मुळे शासकीय कार्यालयात शुकशुकाट दिसून आला. मुळशीत फक्त अत्यावश्यक सेवा सोडून सर्व बंदात सामील झाले होते.