
पुणे: कंपनीच्या कामगारांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सला भीषण आग लागली. या आगीमध्ये टेम्पो ट्रॅव्हल्स अक्षरश: जळून खाक झाली आहे. सीटचा केवळ सांगाडा उरला होता. तर आतमध्ये असलेल्या चार कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. चालकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.
टेम्पो ट्रॅव्हल्सला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. चार जण होरपळून गेले आहेत. टेम्पो ट्रॅव्हल्सचा दरवाजा लॉक झाल्याने उघडला नाही. त्यामुळे होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
टेम्पो ट्रॅव्हल्सला अचानक आग कशी लागली याबाबत सध्या कोणतीही माहिती मिळाली नाही. दोन जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.