माऊलींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी ; भाविकांचा महापूर

Photo of author

By Sandhya

माऊलींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी

माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी लोणंदनगरीत भाविकांचा महापूर लोटला. माऊलींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. माऊलींचा पालखी सोहळा लोणंद नगरीत विसावल्यानंतर गेल्या दोन दिवसांमध्ये माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

लोणंदच्या पालखी तळावर महिला व पुरुष अशा चार रांगा लागल्या होत्या. नगरपंचायत व प्रशासनाच्यावतीने दर्शन रांगांमध्ये पाण्याची सोय तसेच दर्शन रांगांवर छताचे आवरण टाकण्यात आले होते.

त्यामुळे अन्हापासून भाविकांचा बचाव झाला. माऊलींचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांच्या चेहऱ्यावर माऊलीच भेटल्याचे समाधान दिसत होते. माऊलींच्या बरोबरच माऊलींच्या रथाचे तसेच अश्वांचे भाविक दर्शन घेत होते.

यावेळी माऊलींचा पालखीतळ वारकरी व भाविकांनी गजबजून गेला. दोन दिवसांच्या मुक्काम काळात संपूर्ण लोणंद नगरी हरीनामाच्या गजराने दुमदुमुन गेली होती. त्यामुळे अवघ्या लोणंदनगरीला पंढरीचे स्वरूप आले होते.

Leave a Comment