महापौर मंजुषाताई नागपुरे ताई यांच्या पुढाकाराने सफाई कामगाराच्या मुलीच्या उपचाराचा मार्ग मोकळा

Photo of author

By Sandhya

Mayor Manjushatai Nagpure Tai’s initiative paves the way for the treatment of the sanitation worker’s daughter


पुणे महानगरपालिका अंतर्गत वानवडी क्षेत्रीय कार्यालयातील गोसावी आरोग्य कोटी येथे कार्यरत कंत्राटी सेवक श्री. नितीन कमलापुरे यांच्या साडेतीन वर्षांच्या मुलीला कानाचा गंभीर आजार असल्याने तातडीने ऑपरेशन करणे आवश्यक होते. हे ऑपरेशन जर वयाच्या चार वर्षाच्या आत नाही केले तर कायमचा मूक बधिर पणा येऊ असे डॉक्टरांनी सांगितले ..
या उपचारासाठी सुमारे ३७ लाख रुपयांचा खर्च सांगितला होता.
मात्र संबंधित ठेकेदाराकडून ईएसआय (ESI) कार्ड देण्यात आले नव्हते तसेच ईएसआयचे पैसेही भरले गेले नसल्यामुळे या उपचार प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले होते.
ही बाब कामगार हितरक्षक संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या निदर्शनास आल्यानंतर संघटनेने याबाबत पाठपुरावा केला. त्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या महापौर सौ. मंजुषाताई नागपुरे यांनी या प्रकरणात मध्यस्थी करत संबंधित विभागाला आवश्यक सूचना दिल्या.
महापौरांच्या पुढाकारामुळे संबंधित कामगाराला ईएसआय कार्ड मिळाले असून त्यांच्या मुलीच्या उपचार व ऑपरेशनचा मार्ग मोकळा झाला आहे.
याबाबत कामगार हितरक्षक संघ, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री. शरद भाकरे व जनरल सेक्रेटरी श्री. मनीषभाई शेठ यांनी महापौर मंजुषा नागपुरे यांचे आभार मानले.

Leave a Comment

You cannot copy content of this page