PUNE : मेट्रोच्या कामामुळे पुण्यात रस्त्यांची लागली वाट!

Photo of author

By Sandhya

मेट्रो

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीमधील रेंजहिल्सकडे जाणार्‍या रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू आहे. यामुळे बोर्ड प्रशासनाचे रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याने परिसरात अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.

परिणामी, अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाकडून तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी वाहनचालक व नागरिक करीत आहेत.

पुणे-मुंबई रस्त्यावरून बोपोडी, रेंजहिल्सकडे जाणार्‍या मार्गा मेट्रोचे काम सुरू आहे. बोपोडीकडून खडकी पोलिस ठाण्याच्या मागून मेट्रो रेंजहिल्सकडे वळविण्यात आली आहे.

मेट्रोचे काम जलद गतीने सुरू आहे. मात्र, या कामामुळे रस्त्याच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत.

खडकी पोलिस ठाण्याजवळून जाणार्‍या रेल्वे बोगद्यापासून डावीकडे रेंजहिल्सकडे जाणार्‍या रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत असून, नागरिकांचीही मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. प्रशासनाने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

मेट्रोच्या कामामुळे खडकी, आरटीओ कार्यालय परिसर, पौड रोड आणि बाणेर भागातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. रस्त्यांवर खड्डे पडल्यामुळे वाहनचालक व नागरिकांची गैरसोय होत आहे. काही ठिकाणी रस्तादुरुस्तीसह पदपथांची कामे अर्धवट असल्याने अपघातही होत आहेत. यामुळे रस्तादुरुस्तीसह पदपथांची कामे तातडीने करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page