शिरूर : शिरूर तालुक्यातील काठापुर येथे एका घराचे काम करणाऱ्या सुरेश भगवान ढोकणे (वय ३९, रा. नागापूर, ता. जि. बीड) या मिस्तरीने घरातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा लैंगिक छ्ळ करुन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी सुरेश ढोकणे याला शिरूर पोलिसांनी तत्परतेने शोध घेत बेड्या ठोकल्या आहे.
याबाबत सविस्तर हकीगत अशी की, २७ डिसेंबर २०२४ पासून २२ जानेवारी २०२५ रोजी पर्यंतच्या कालावधीमध्ये वेळोवेळी शिरूर तालुक्यातील काठापूर खुर्द या ठिकाणी फिर्यादी यांच्या राहत्या घराच्या हॉलमध्ये मिस्त्री काम करण्यासाठी आलेल्या सुरेश भगवान ढोकणे (वय ३९, रा. नागापूर, ता. जि. बीड) याने अल्पवयीन १३ वर्षीय मुलीवर बलात्कार केला आहे.
दरम्यान, याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ आरोपीस अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक करांडे हे करत आहेत.