विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभेसाठी महाविकास आघाडी तसेच महायुतीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु असतानाच आता प्रहार’ संघटनेचे बच्चू कडू, ‘स्वाभिमानी शेतकरी’ संघटनेचे राजू शेट्टी तसेच ‘स्वराज्य’ संघटनेचे संभाजीराजे यांनी तिसऱ्या आघाडीचे आव्हान उभे केले आहे.
तसेच आगामी निवडणुकीत शिंदे- फडणवीस यांच्याविरोधात तगडे उमेदवार देणार, अशीही घोषणा आमदार बच्चू कडू यांनी केली आहे.
मविआत मोठा भाऊ कोण? जागांवर अडले, भाऊ-भाऊ भिडले; मविआत जागावाटपावरून खडाजंगी काय म्हणाले बच्चू कडू? काही दिवसांपूर्वीच तिसरी आघाडी ही नेहमी भाजपला मदत करते अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. यावरुनच प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी जोरदार पलटवार केला आहे.
संजय राऊत यांच्याकडे पुऱ्या महाराष्ट्राचा पीआर कार्ड नाही, संजय राऊत यांचा अभ्यास कमी आहे त्यांची जहागीरदार नाही असा घणाघात करत महाराष्ट्रात तिसरा पर्याय मजबुतीने देऊ, असे बच्चू कडू म्हणाले. तसेच “महाशक्तीचा राज्यात मुख्यमंत्री दिसेल असा मोठा दावा बच्चू कडू यांनी केला.
आमची महाशक्ती पुऱ्या देशात आदर्श ठरेल, देशभरात आदर्श वाटेल असे राज्य उभे करु असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मजबूत उमेदवार देऊ व 288 जागा पूर्ण लढवू,” अशीही घोषणा बच्चू कडू यांनी केली.