मोरगाव ता बारामती येथे विद्युत वितरण कंपनी कार्यालयात समोर दिनांक 24 एप्रिल रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास आरोपी अभिजीत पोटे याने महावितरण कर्मचारी रिंकू राम थिटे हिच्या वरती धारदार कोयतेच्या साह्याने हल्ला केला यामुळे मोरगाव परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अशी ही गंभीर घटना मोरगाव मध्ये समोर आली आहे.
दुचाकी वरून आलेल्या आरोपी अभिजीत पोटे हा माथे फिरू असल्याचे समजत आहे यातील जखमी महिला कर्मचारी रिंकू राम थिटे यांना उपचारासाठी दवाखान्यात पाठवण्यात आले आहे.
मोरगाव – जेजुरी या जिल्हा मार्गालगत शासकीय विश्रामगृह शेजारी महावितरण विभागाचे हे कार्यालय आहे. काही या कार्यालयात कामकाज करत असलेल्या महिला वायरमन रिंकू राम थिटे यांच्यावर प्राण घातक हल्ला करण्यात आला या ठिकाणी आलेल्या अरोपी अभिजीत पोटे या दुचाकी स्वार याने कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याचे समोर आले. आहे
या कार्यालयाला लागूनच असलेल्या सबस्टेशन ठिकाणी कामकाज करणारे तंत्रज्ञ कर्मचारी मीटरचे रीडिंग घेण्यासाठी सब स्टेशनच्या आवारात काम करत होते यावेळी यांना या कार्यालयातून ओरडल्याचा आवाज आल्याने त्यांनी या कार्यालयाकडे धाव घेतली. यावेळी या महिला कर्मचाऱ्यावर अज्ञात व्यक्तीने प्राण घातक हल्ला केल्याने त्या जखमी झाल्याचे निदर्शनास आले.
सदर या घटनेचा पुढील तपास पोलीस निरिक्षक जी एस कोळी उप निरीक्षक नागनाथ पाटील व त्यांचे सहकारी करत आहेत