मोठा अपघात; पुलावरून बस कोसळून १५ ठार,२५ जखमी

Photo of author

By Sandhya

मोठा अपघात; पुलावरून बस कोसळून १५ ठार,२५ जखमी

मध्य प्रदेशमधील खरगोन येथे आज (दि.०९) सकाळी ८.३० च्या सुमारास मोठी बस दुर्घटना घडली. खरगोन जिल्ह्यातील श्रीखंडीहून इंदूरकडे जाणारी बस पुलावरून कोसळली. यामध्ये १५ प्रवाशांचा मृत्यू झाला असून, २५ जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचाव कार्य सुरू असल्याची अशी माहिती खरगोनचे एसपी धरम वीर सिंग यांनी दिली आहे.

खरगोन जिल्ह्यातील श्रीखंडीहून इंदूरकडे जाणारी बस अचानक बोराड नदीच्या पुलाचे रेलिंग तोडून ५० फूट खाली कोसळली. MST हिरामणी ट्रॅव्हल्सची क्रमांक MP 10 P 7755 ही बस ओव्हरलोड होती. यामध्ये एकूण ३५ प्रवाशी होते. यामधील १५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ड्रायव्हर, कंडक्टर आणि क्लिनरचा समावेश आहे.

या दुर्घटनेती जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र आणि खरगोन जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. घटनास्थळी खरगोनचे एसपी, जिल्हाधिकारी आणि आमदार घटनास्थळी पोहोचले आहेत. अशी माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना तात्काळ मदत जाहिर मध्य प्रदेश सरकारने खरगोन बस अपघातात मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये, गंभीर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये आणि किरकोळ जखमी झालेल्यांना प्रत्येकी 25,000 रुपये तत्काळ आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे

Leave a Comment

You cannot copy content of this page