MPSC च्या विध्यार्थ्यांच्या समस्या काही संपता संपेना

Photo of author

By Sandhya

MPSC च्या विध्यार्थ्यांच्या समस्या काही संपता संपेना

पुणे – एमपीएससी हॉल तिकीट लिक प्रकरणानंतर ही परिक्षा रद्द होते की काय? याबाबत उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र कोणताही डाटा लिक झाला नसून उमेदवारांची माहिती सुस्थितीत असल्याची माहिती एमपीएससीकडून देण्यात आल्यानंतर परीक्षेला हिरवा कंदील मिळाला.

त्यामुळे आज रविवार दि. 30 एप्रिल रोजी परीक्षा पार पडली. उमेदवारांची बायोमेट्रिक मशिनवर हजेरी घेत परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जात होता. यावेळी काही ठिकाणी बायोमेट्रिक मशिनच बंद पडल्याने उमेदवारांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागला आहे. या समस्येचे निराकरण न झाल्यामुळे सरसकट उमेदवारांना परिक्षा केंद्रात सोडण्याचा निर्णय एमपीएससीकडून घेण्यात आला.

दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे आज रविवार दि. 30 एप्रिल रोजी अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 ही परीक्षा घेण्यात आली आहे.

तर या परीक्षेसाठी राज्यातील 37 जिल्हा केंद्रावरील एकूण 1 हजार 475 परीक्षा उपकेंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. परिक्षेसाठी राज्यभरातून सुमारे 4 लाख 67 हजार 85 विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. त्यापैकी साधारणपणे 80 टक्के उमेदवारांची परीक्षेला उपस्थिती दर्शवली होती.

Leave a Comment