राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून श्रीमती सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांनी स्वीकारला कार्यभार

Photo of author

By Sandhya

Mrs. Sunetra’s sister-in-law Ajitdada Pawar took charge as the first woman Deputy Chief Minister of the state.

मुंबई – महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून श्रीमती सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांनी आज विधिवतपणे उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला.

या ऐतिहासिक प्रसंगी श्रीमती सुनेत्रा वहिनी पवार यांनी महाराष्ट्राच्या जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त करत, सर्वसामान्य नागरिक, महिला, शेतकरी, युवक आणि वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. राज्याच्या प्रगतीसाठी पारदर्शक, संवेदनशील आणि लोकाभिमुख प्रशासन देण्याचे त्यांनी आश्वासन दिले.

कार्यभार स्वीकारताना उपस्थित मान्यवर, वरिष्ठ अधिकारी, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या या नियुक्तीमुळे महिला सक्षमीकरणाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

श्रीमती सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांचा हा प्रवास राज्यातील महिला नेतृत्वासाठी प्रेरणादायी ठरणार असून, महाराष्ट्राच्या विकासात तो नवा अध्याय जोडणारा ठरेल.

Leave a Comment

You cannot copy content of this page