मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : बाळासाहेबांचे स्वप्न पंतप्रधान मोदी पूर्ण करत आहेत

Photo of author

By Sandhya

बाळासाहेबांचे स्वप्न पंतप्रधान मोदी पूर्ण करत आहेत

मुंबई ठाण्यात एकच जयघोष पाहायला मिळत आहे जय श्रीराम जय श्रीराम… आपल्याला लवकरच आयोध्येत जायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तेथे राम मंदिर उभारत आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे ते स्वप्न होते.

ते पंतप्रधान मोदी पूर्ण करत आहेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगत येत्या काळात लवकरच राम मंदिराचे काम पूर्ण होऊन ते भाविकांसाठी खुले होणार असल्याचे संकेत शिंदे यांनी दिले.

कल्याण येथील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर दुर्गाडी देवी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरी केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी कल्याण येथे येत दुर्गाडी देवीचे दर्शन घेतले.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. आमदार विश्वनाथ भोईर, कल्याण शहर प्रमुख रवी पाटील हे यावेळी उपस्थित होते. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी डोंबिवली येथे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या रासरंग या कार्यक्रमास उपस्थिती लावली.

यानंतर त्यांनी डोंबिवली येथे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या रासरंग या दांडिया उत्सवास उपस्थिती लावली. यावेळी शिंदे यांनी उवस्थितांना शुभेच्छा देताना महाविकास आघाडी सरकारला टोला हाणला आहे.

राज्यात आमचे सरकार येताच सगळे निर्बंध आम्ही उठवले आहेत. मंदिर खुली केली, सन उत्सवांवरील बंदी उठवली असे ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी मुंबई, ठाणेसह राज्यात सगळीकडे जय श्रीराम जय श्रीराम गाणं म्हणतात असे म्हणत त्यांनी तुमच्या इथे गाणं लागलं का नाही ? असा प्रश्न आयोजकांना करताच ते गाणे आयोजकांनी लावले.

यावर एक ही नारा एक ही नाम जय श्रीराम जय श्रीराम असे शिंदे म्हणाले. अयोध्येत राम मंदिर बनत आहे. लाखो करोडो भक्तांचे स्वप्न साकार होत आहे. आणि मोदीजी ते काम करत आहेत.

त्यामुळे आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांच्या आभार मानतो. आपल्या सगळ्या लोकांचे हे सरकार आहे तुम्हाला जे हवं आहे तेच हे सरकार करेल असा विश्वास त्यांनी यावेळी जनतेला दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्गाडी देवीचे दर्शन घेत केली आरती दुर्गाडी देवीचे दर्शन हजारो लाखो भाविक घेत असतात. वर्षानुवर्ष ही परंपरा सुरू आहे. दुर्गाडी किल्ल्याच्या डागडुजीसाठी साडे 7 कोटी मंजूर केलेले आहेत. त्यात अडीच कोटींचं काम सुरू आहे.

5 कोटींचे काम सुरू होईल आणखी जे काही कामाला पैसे लागतील ते देखील शासनाच्या वतीने देण्यात येईल. या किल्ल्याची या देवस्थानाची अनेक वर्षाची परंपरा आहे.

त्यामुळे शासनाच्या माध्यमातून काही कमी पडणार नाही. महाराष्ट्र मध्ये यंदा नवरात्र उत्सव गेल्या वर्षी पेक्षा जास्त उत्साह यावर्षी पाहायला मिळतं आहे असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

Leave a Comment

You cannot copy content of this page