राज्यातील राजकारण मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या भोवती फिरत आहे. असे असतानाच मराठा आरक्षणासाठी आज ( 20 फेब्रुवारी ) विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.
या अधिवेशनापूर्वी एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरून मोठे व्यक्तव्य केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवनेरी गडावर ग्वाही दिली आहे की,’मराठा समाजाची लोकसंख्या २७ टक्के असल्याचा अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाने दिला असून त्याआधारे स्वतंत्र संवर्ग करून १० टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव आहे.
दुसरीकडे ओबीसीच नव्हे, तर अन्य कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिले जाईल.’ असेही ते म्हणाले आहे.
दरम्यान विशेष अधिवेशनात सरकारनं काढलेल्या सगेसोयरेंच्या कुणबी नोंदी संदर्भातील अधिसूचनेचा मुद्दा येण्याची शक्यता कमी आहे. सामाजिक न्याय विभागाकडे तब्बल साडेचार लाख हरकती आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सध्या सामाजिक न्याय विभागाकडून आलेल्या हरकतींबाबत अभ्यास सुरु आहे. लवकरच याबाबतचा अहवाल सरकारला सादर करण्यात येणारेय.
विधीमंडळाचे आजचे कामकाज असे असेल यापूर्वीही ओबीसी समाजाचे आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटले होते.