
आज पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यात अनेक प्रकल्पांचे उद्घाटन झाले. यावेळी सभेत बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांना धन्यवाद दिले.
आपल्या भाषणाची सुरुवात त्यांनी शिवाजी महाराजांचा जय जयकार करून केली. आपल्या भाषणात पुढे बोलताना ते म्हणतात, पंतप्रधान मोदी हे सर्वांगिण विकासाचा अजेंडा पुढे घेवून जात आहेत. त्यांच्याकडे संयम, धैर्य आणि सबुरी आहे.
देशाला ते महासत्ता बनवू पाहतात, त्यामुळे त्यांना धन्यवाद देतो. आपल्या नेतृत्वावर 140 कोटी जनतेचा विश्वास आहे. वर्षभरापूर्वी युती सरकार स्थापनेनंतर सहा वेळेस पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात आले.
निमंत्रण स्वीकारले हा त्यांचा मोठेपणा आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात त्यांच्या हातून महाराष्ट्रात 2 लाख कोटी कामांचे भूमीपूजन झाले. आज 14 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कामांचे उद्घाटन होत आहे.
निळवंडेमुळे आज पावणेदोन लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. जनतेच्या आनंदासाठी सरकारने मोदी जन्मदिवशी नमो शेतकरी सन्मान योजना, नमो महिला सक्षमीकरण योजना, कष्टकरी, तरुण योजनांसह विविध उपक्रमांना गती दिली.
मागील अडीच वर्षात सगळे प्रकल्प बंद होते. त्याला चालना दिली. नवीन प्रकल्प सुरू केले. डबल इंजिन सरकारची आवश्यकता होती. देवेंद्र फडणवीसोबत पहिल्यांदा शपथ घेतल्यानंतर दुष्काळग्रस्त जिल्हा, मराठवाडा, विदर्भ समुद्रातून जाणारे पाणी वळण्याची योजना आराखडा केला.
पण तो राज्याच्या आवाक्याबाहेर होता. या योजनेला केंद्राने पाठबळ दिले तर लाखो शेतकर्यांना फायदा होईल. समृध्दी, मेट्रो, 35 सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली.
लाखो हेक्टर ओलिताखाली आणली. मोदी ज्या कामाला हात लावतात, भूमिपूजन करतात, तो वेगाने पुढे जातो, पूर्ण होतो. मोदी हात लावतात त्याचं सोनं होतं. त्यामुळे त्यांना वारंवार बोलवतो.
यामुळे काहींच्या पोटात दुखत. त्यांच्यासाठी 700 ठिकाणी बाळासाहेब ठाकरे दवाखाना सुरू केला आहे. नमो किसान योजनेंतर्गत 1700 कोटी एकाच वेळी शेतकर्यांच्या खात्यात जाणार आहेत. आपल्या मार्गदर्शनात सरकार निर्णय घेत आहेत.
राम मंदिर बनविण्याचे स्वप्नही मोदींनी पूर्ण केेले आहे. ठाकरे यांचेही स्वप्न पूर्ण केले आहे. त्यामुळे करोडो रामभक्त खुष आहेत. कितीही रावण एकत्र आले तर इंडि बाल वाकडे करू शकत नाही.
2019 ला विरोधक असेच एकत्र आले होते. पण देशातील जनता आपल्यासोबत असल्यामुळे 2024 लाही पूर्ण ताकदीने पंतप्रधान हे मोदी बनतील, ही काळ्या दगड्यावरची रेघ असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.