मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : सोलापूर 65 एकरचा कायमचा तोडगा काढणार…

Photo of author

By Sandhya

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पंढरपूर येथील 65 एकर जागेवरील प्लॉटची एकाच दिवशी एकाच वेळी वाटप व्हावे त्यासाठी कायमचा तोडगा काढण्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप सुधाकर महाराज इंगळे, अमोल शिंदे यांच्या भेटीप्रसंगी दिले.

यावेळी तानाजी सावंत उपस्थित होते. पंढरपूर येथे वर्षभरात चार वारीला वारकरी भाविक 65 एकरमधील प्लॉट घेऊन तीन ते पाच दिवस मुक्कामी राहतात.

पूर्वी नदी वाळवंटामध्ये राहात होते; परंतु स्वच्छतेचे कारण समोर आले आणि सर्वांना 65 एकरमधील प्लॉटमध्ये राहण्यासाठी ती जागा खुली केली आहे; परंतु 65 एकरमधील प्लॉट घेण्यासाठी वारकरी भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे.

प्रत्येक वारीला प्लॉट घेण्यासाठी स्वतंत्र नवीन अर्ज करावा लागत आहे. प्रत्येक वारीला 65 एकरमध्ये दिंडी वेगवेगळी असते. प्रत्येक वारीला त्या त्या दिंडीला वेगवेगळा प्लॉट देण्यात येत आहे. त्यामुळे पाठीमागून येणार्‍या भाविकांना मंडप सापडणे, दिंडी मिळणे कठीण होत आहे.

एका दिंडीला एका वर्षात फक्त तीन ते पाच दिवस तो प्लॉट अपेक्षित आहे. सर्व वारीतील दिंडीला 65 एकरमध्ये प्लॉट अपेक्षित आहे. प्रत्येक प्लॉट सिमेंट काँक्रिट करण्यात यावे, प्रत्येक प्लॉटवर पत्राशेड उभे करण्यात यावेत,

आणखी 100 एकर जागा वारीसाठी उपलब्ध करून देण्यात यावी, यासह अन्य मागण्यांचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांना देण्यात आल्याचे इंगळे महाराज यांनी सांगितले.

Leave a Comment