मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून लाडकी बहीण योजनेसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा…

Photo of author

By Sandhya

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना १ जुलैपासून सुरू करण्यात आली आहे. तसेच वर्षाला ३ गॅस सिलिंडर मोफत देण्यात येणार आहेत. या योजनेसाठी पैशांची मागणी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.३) पत्रकारांशी बोलताना दिला.

ते पुढे म्हणाले की, लाडकी बहीण योजनेबाबत महिलांना अरेरावी करणाऱ्या बुलढाण्यातील तलाठ्या वर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच या योजनेत नावे नोदविण्यासाठी पैसे मागणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल. या योजनेंतर्गंत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेत वर्षांला ३ गॅस सिलिंडर मोफत देण्यात येणार आहेत. या योजनांच्या अंमलबजावणीसाठी सरकारने आर्थिक तरतूद केलेली आहे.

त्याचबरोबर सरकारकडून आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सर्व वारकऱ्यांना विमा कवच देण्यात आले आहे. ३ जुलै ते २१ जुलैपर्यंत आषाढी वारीसाठी जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी देण्यात येणार आहे. त्यामुळे लाखो वारकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलताना हिंदूंबाबत केलेल्या विधानावर मुख्यमंत्री शिंदे यांनी टीकास्त्र सोडले. विशिष्ठ वर्गाला खूश करण्यासाठी राहुल गांधी यांनी वक्तव्य केले आहे. त्यांना देशातील संयमी हिंदू कधीही माफ करणार नाहीत. विरोधी पक्षांच्या आरोपांकडे आम्ही लक्ष देत नाही.

Leave a Comment