मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील डहाणू तालुक्यातील मेंढवन खिंडीत ऑईल नेणारा टँकर पलटल्याची घटना घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मात्र या घटनेचा परिणाम गुजरातकडे जाणाऱ्या वाहतूक व्यवस्थेवर झाला आहे. शिवडी येथून गुजरातकडे निघालेला टँकर मेंढवन खिंडीतील चिंचपाडा येथे पलटल्याची घटना घडली आहे.
चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत टँकर चालक किरकोळ जखमी झाला असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी नाही.
ऑइल टँकर मधून गळती सुरू असल्याने खबरदारीचा उपाययोजना म्हणून गुजरातकडे जाणाऱ्या वाहिनीवर एक वाहिनी बंद करण्यात आली आहे. मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे.
मात्र गुजरातकडे जाणारी वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. तीन वाहिन्यावर धीम्या गतीने वाहतूक सुरू आहे. महामार्ग पोलीस, मृत्युंजय दूत, महामार्ग यंत्रणा घटनास्थळी पोहोचले असून टँकर बाजूला करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.