मुंबई-पुणे महामार्गावर कारला आग; वाहनांच्या १० किमी लांबीच्या रांगा

Photo of author

By Sandhya

मुंबई-पुणे महामार्गावर कारला आग; वाहनांच्या १० किमी लांबीच्या रांगा

Mumbai Pune Expressway Latest News : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर कारला आग लागल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे महामार्गावर वाहतूकीची कोंडी झाली असून तब्बल १० किमी लांबीच्या वाहनांच्या रांगा लागल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खोपोली जवळ पुणे लेन वर ही दुर्घटना घडली असून या घटनेत महेंद्रा XUV कार जळून खाक झाली. सुदैवाने या अपघातामध्ये कुठल्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही. अग्नी शमन दलाने आग विझवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही. या घटनेमुळे महामार्गावर लांबच लांब वाहनाच्या रांगा लागल्याचं पाहायले पाहायला मिळाले.

तसेच ऐन सुट्टीच्या दिवशी महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना वाहतुक कोंडीचा फटका बसला. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे अनेक जण खाजगी वाहनाने बाहेरगावी निघाल्याने रस्त्यांवर वाहनांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आलं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली .

दरम्यान वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून 10-10 मिनिटांचे ब्लॉक घेऊन गाड्या विरुद्ध दिशेने सोडून ट्रॅफिक सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page