मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी पहाटे कंटेनर आणि पिकअप टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक जण ठार झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
पुण्यातील खंडाळा घाटातील आंदा पॉईंट येथे एका भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरने पिकअप टेम्पोला जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला आहे.
ही धडक एवढी जोरदार होती की कंटेनर थेट पीकअपवर पलटी झाला आहे. या अपघातात मृत्यूमुखी पडलेलल्या तसेच जखमी झालेल्यांची नावे समजू शकली नाहीत. जखमींना खोपोलीच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती आहे.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी केमिकल ट्रकचा अपघात होऊन चार जण ठार झाल्याची घटना ताजी असतांनाच आणखी एक मोठा अपघात झाला आहे.
जुन्या मुंबई पुणे हायवेवर खंडाळ्याजवळ अंडा पॉइंट येथे आज शनिवारी पहाटे हा अपघात झाला. एका भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरची आणि पीकअपची जोरदार धडक झाली. या धडकेत कंटेनर हा पीकअपवर पलटी झाल्याने एक ठार झाला आहे. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.