या महिन्यात 24 ते 29 या केवळ सहा दिवसांच्या कालावधीत संपुर्ण जून महिन्यात नोंदवल्या गेलेल्या एकूण सावसाच्या 95 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस मुंबईत झाला आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून दिसून आले आहे.
गेल्या सहा दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असला तरी या महिन्यात शहरात पावसाची जून महिन्यातील सरासरी भरून निघालेली नाही. दक्षिण मुंबईतील कुलाबा वेधशाळेतील नोंदीनुसार जून महिन्यात सरासरी 542.3 इतका पाऊस पडतो.
यावर्षी, 395 मिमी पावसाची नोंद झाली आहे, त्यापैकी 371.4 मिमी पाऊस 24 ते 29 जून दरम्यान पडला आहे. सांताक्रूझ हवामान केंद्रात जून महिन्याची सामान्य सरासरी 537.1 मिमी इतकी आहे.
यावर्षी, 1 ते 29 जून दरम्यान, 502.9 मिमी पावसाची नोंद झाली आहे, ज्यात 24 ते 29 जून दरम्यान झालेल्या 485 मिमी पावसाचा समावेश आहे. नैऋत्य मोसमी पावसाला मुंबईत 25 जून रोजी मुंबईत सुरुवात झाली.