नाना पटोले : काँग्रेसला संविधान राज्य, रामराज्य दोन्हीही अपेक्षित

Photo of author

By Sandhya

नाना पटोले

काँग्रेसला संविधान राज्य आणि रामराज्य दोन्हीही अपेक्षित आहे. संविधानाने सर्व धर्मांना न्याय आणि प्रेरणा दिली. तर राज्यात कोणीही दु:खी राहू नये, सर्वांना समान न्याय मिळावा, आणि प्रजेचे हित राखले जावे, असे रामराज्य असले पाहिजे.

पण भारतीय जनता पार्टीचे आजचे रामराज्य नसून रावण राज्य आहे. जनतेच्या मनातील राम हा अशा रावणाला जागा दाखवेल, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज (दि.२७) भाजपवर शरसंधान साधले. धुळ्यात काँग्रेसचे उत्तर महाराष्ट्रस्तरीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले.

या बैठकीस महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, के. सी. पाडवी, नानासाहेब गावंडे, शिरीष चौधरी, पद्माकर वळवी, अनिल पटेल, काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील व आमदार प्रणिती शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष युवराज करणकाळ, जिल्ह्याच्या प्रभारी तथा माजी मंत्री शोभाताई बच्छाव तसेच रमेश श्रीखंडे, धुळे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर आदी उपस्थित होते.

राज्याचे प्रभारी चेन्नीथला म्हणाले की, काँग्रेसच्या आतापर्यंत सहा विभागात कार्यकर्त्यांशी संवाद झाला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस तयार करण्यासाठी हा कार्यक्रम होतो आहे.

यात नेत्यांसह कार्यकर्ते एक दिलाने सहभागी होत असून आगामी इंडिया आघाडीच्या माध्यमातून सर्व मतभेद विसरून काँग्रेस काम करणार आहे.

असे त्यांनी सांगितले.देशात सीपीएम आणि वंचित आघाडी यांच्या समवेत चर्चा सुरू असून आम्ही स्वतः वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या बोलणे केले आहे. त्यामुळे सर्व दल एकत्र लढतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave a Comment