नाना पटोले : महाराष्ट्रातही भाजपचा पराभव करू

Photo of author

By Sandhya

नाना पटोले : महाराष्ट्रातही भाजपचा पराभव करू

कर्नाटकमध्ये आजपासून नव्या पर्वाला सुरुवात झाली असून, जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याचे काम काँग्रेसचे हे नवे सरकार करेल.

आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातील जनता परिवर्तन घडवेल आणि राज्यात काँग्रेसचे सरकार येईल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रात कटकारस्थान करून आलेले डबल इंजिनचे सरकार जनतेच्या मनातून उतरलेले आहे. भाजपप्रणीत शिंदे सरकारचा आगामी निवडणुकीत जनताच पराभव करेल.

कर्नाटकातील काँग्रेस सरकार जनतेला दिलेल्या पाच महत्त्वाच्या आश्वासनांची अंमलबजावणी पहिल्या कॅबिनेटपासूनच सुरू होईल.

ते म्हणाले, आश्वासने पाळणारे काँग्रेस सरकार असून, महाराष्ट्रातही महाविकास आघाडी सरकार असताना दिलेल्या आश्वासनांनुसार पहिला निर्णय शेतकरी कर्जमाफीचा घेतला होता. राज्यात सध्या असलेले शिंदे सरकार शेतकरी, कष्टकरी यांना उद्ध्वस्त करणारे आहे.

Leave a Comment