नाना पटोले : सरकारने शेतकऱ्यांची दिवाळी काळी केली

Photo of author

By Sandhya

नाना पटोले

राज्य शासनाने दुष्काळ अजून जाहीर न केल्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी काळी केली आहे. आम्ही याचा निषेध करत आज भंडाऱ्यात मोर्चा काढत आहे.

जनता या सरकारचा धिक्कार करीत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. यावेळी पटोले म्हणाले, “देशाच, राज्याच कॅबिनेट जनतेला दिलासा देण्यासाठी असतो.

एक वेगळे बोलतो, दुसरा वेगळे बोलतो, मंत्रिमंडळात राहता कशाला मग? सरकार म्हणते ओबीसींचे नुकसान करणार नाही. दुसरीकडे तुमच्या मनात काय? हे जनतेला कळू द्या. आज राज्य जळत आहे, राज्याचे नुकसान होत आहे.

ओबीसी विरुद्ध मराठा वाद निर्माण करून मूळ प्रश्नाकडे सरकार लक्ष विचलित करत आहे. राज्यात अडीच लाख पदे खाली आहेत. नालायक आणि बधीर झालेले सरकार आहे.

आता जनताच यांना धडा शिकवेल. जातनिहाय जनगणनेला भाजपचा विरोध आहे. भाजपला आरक्षण व्यवस्था संपवायची आहे. बिहारमध्ये जशी जनगणना झाली तशी देशात झाली पाहिजे.

मात्र, तसे होत नाही. म्हणून नितीश कुमार यांनी बिहारमध्ये जातनिहाय जनगणना केली आहे. पाच दिवसांपूर्वी तीन मंत्र्यांनी आढावा घेत धान खरेदीचा निर्णय केला. मात्र, अजून धान खरेदी केलेले नाहीत. मुळात हे सर्व व्यापाऱ्यांना मदत करण्यासाठी केले जात आहे. सरकार धान उत्पादक शेतकऱ्यांना उध्वस्त करत असल्याचा आरोप पटोले यांनी केला.

Leave a Comment