नाशिक: सख्खा शेजारीच निघाला पक्का वैरी! इडलीच्या गाडीला लाथ मारल्याचा राग, हॉटेल मालकाची निघृण हत्या

Photo of author

By Sandhya

नाशिकमध्ये हॉटेल मालकावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हॉटेल मालकाचा जागीच मृत्यू झाला, या घटनेने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.

तरुणाच्या हत्येने नाशिक शहर पुन्हा एकदा हादरले आहे. इडली डोसा विक्री करणाऱ्या तरुणाच्या गाडीला लाथ मारल्याच्च्या रागातून ६ जणांच्या टळक्याने एका हॉटेल चालकावर धारदार शस्त्राने आणि डोक्यात दगड घालून प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हॉटेल मालकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास नाशिकच्या सिटी सेंटर मॉलजवळ असलेल्या क्रांतीनगर भागातील संभाजी चौक परिसरात ही घटना घडली. हत्या झालेला तरुण आणि संशयित एकमेकांच्या ओळखीचे आणि घराच्या शेजारी राहणारे होते अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. नितीन शेट्टी (४० वर्षे) असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

नितीन शेट्टी हे आपल्या संभाजी चौकातील हॉटेलवर असताना घराशेजारील राहणाऱ्या ५ ते ६ जणांच्या टोळक्यांनी येऊन त्यांच्यी वाद घातला. सकाळी तू आमच्या रोजी रोटी असलेल्या इडलीच्या गाडीला लाथ मारली असं म्हणत वाद घातला त्यानंतर नितीन शेट्टीवर हल्ला केला. चाकू आणि कोयत्याने नितीन यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले नितीन रक्ताच्या थारोळ्यात पडले. ऐवढ्यावर न थांबत आरोपींनी नितीन यांच्या डोक्यामध्ये दगड घातला.

या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या नितीनचा जागीच मृत्यू झाला. नितीन शेट्टी यांची हत्या करून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी नाशिकच्या मुंबई नाका पोलिसांनी ६ जण आंविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. पोलिस सध्या फरार आरोपींचा शोध घेत आहेत, त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी टीम तयार केल्या आहेत.

Leave a Comment