नवनीत राणा : ‘यंदा मला त्यांनी का थांबवलं, हे मला…’

Photo of author

By Sandhya

 नवनीत राणा

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाला. येथे काँग्रेसच्या बळवंत वानखडे यांनी १९ हजार ७३१ मतांनी राणा यांचा पराभव केला. यानंतर पहिल्यांदाच नवनीत राणा यांनी माध्यमांशी बोलतांना आपल्या मत मांडलं.

अमरावतीच्या जनतेने मला का थांबवलं, याचा मी विचार करतेय. असेही त्या म्हणाल्या आहे. माजी खासदार राणा पुढे म्हणाल्या,’पाच वर्षांपूर्वी जनतेने मला अमरावतीचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी मला दिल्लीला पाठवलं होतं.

परंतु, यंदा मला त्यांनी का थांबवलं, हे मला अजूनही समजू शकलेलं नाही. मात्र, हा पराभव म्हणजे शेवट नाही, गेल्या पाच वर्षांत मी प्रमाणिकपणे काम केलं आहे’ असेही त्या म्हणाल्या आहे.

उद्धव ठाकरेंवर टीका करतांना त्या म्हणाल्या,’नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमधील मतांचं प्रमाण बघा. भाजपला सर्वाधिक मतं मिळाली आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या पोपटाचं ऐकण्याची आवश्यकता वाटत नाही.

तसेच उद्धव ठाकरे ज्या सुरात नरेंद्र मोदींना निमंत्रण देऊ असं बोलत होते, त्यांनी आता पाहिलं असेल की खरा वाघ कोण आहे. तसेच मला वाटतं की मी आता पराभूत झाले आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आता हनुमान चालीसा पठण करायला हवी.’

Leave a Comment