BREAKING NEWS : नवीन संसद भवनाच्या उद्घाटन स्मरणार्थ ७५ रुपयांचे नाणे लाँच करणार

Photo of author

By Sandhya

७५ रुपयांचे नाणे

देशाच्या अर्थ मंत्रालयाने आज (दि.२६) मोठी घोषणा केली आहे. २८ मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे. या अविस्मरणीय क्षणाच्या स्मरणार्थ अर्थ मंत्रालयाकडून ७५ रुपयांचे नाणे लाँच केले जाणार आहे, असे मंत्रालयाने  स्पष्ट केल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (दि.२८) नवीन संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमाला जवळपास २५ पक्ष उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान २० विरोधी पक्षांनी नवीन संसद भवन उद्घाटनच्या कार्यक्रमावरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या राजकीय खडाजंगीमध्येच अर्थ मंत्रालयाकडून नवीन भारतीय चलनाची आज (दि.२६) घोषणा करण्यात आली आहे.

७५ रुपयांचे नाण्याची ‘ही’ आहे खासियत या ७५ रूपयांच्या नाण्याविषयी अधिक माहिती  सांगताना मंत्रालयाने म्हटले आहे की, हे नाणे गोलाकार असून, त्याचा व्यास ४४ मिलीमीटर असणार आहेत. तसेच या नाण्यावर संसद परिसर आणि नवीन संसद भवनाची प्रतिमा असेल. संसद परिसराच्या प्रतिमेच्या खाली आंतरराष्ट्रीय अंकांमध्ये ‘2023’ हे वर्ष देखील कोरलेले असणार आहेत. तसेच हे नाणे ५० टक्के चांदी, ४० टक्के तांबे, ५ टक्के निकेल आणि ५ टक्के जस्त असलेले चतुर्थांश मिश्रधातूचे बनलेले असेल.

Leave a Comment