‘नवरा माझ्यासाठी गात नाही’ म्हणून नवऱ्यावर पोलीस केस

Photo of author

By Sandhya

'नवरा माझ्यासाठी गात नाही' म्हणून नवऱ्यावर पोलीस केस

पती-पत्नीमधील भांडणे नेहमीच ऐकायला आणि पाहायला मिळतात. अनेक वेळा हे भांडण इतके टोकाला जाते की, ते पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचते. यानंतर ते समन्वयाने सोडवले जाते. आता असाच एक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पोलिससुद्धा चकित झाले.

एक महिला तिची तक्रार घेऊन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली होती की, तिचा पती तिच्यासाठी गाणी गात नाही. महिलेची तक्रार ऐकून घेतल्यानंतर पोलीस काही काळ विचारात पडले.

यानंतर त्या महिलेची तक्रार लक्षात घेऊन तिच्या पतीला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. तुमच्या पत्नीने तुमच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, असे त्याला सांगण्यात आले.

यानंतर पोलीस स्टेशनमध्येच पतीने पत्नीला शांत करण्यासाठी आतिफ अस्लमचे गाणे गायले. पती जेव्हा तिच्यासाठी गाणे म्हणत होता तेव्हा पत्नी समोर उभी राहून ते ऐकत होती. या दरम्यान या दाम्पत्याचे भांडण पोलीस ठाण्यातच मिटल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page